The crowd gathered in the Malwanchar, bumpers, tourists and tourists
मालवणात सापडली बंपर तारली, पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 03:38 PM2017-12-10T15:38:24+5:302017-12-10T15:42:36+5:30Join usJoin usNext मालवण किनारपट्टीवर तारली मासळी बंपर स्वरूपात आढळून आली. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती. मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. हिवाळी हंगामात सिंधुदुर्ग पर्यटनासाठी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची किनारपट्टी आहे. ओखीच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या त्यातूनच तारली सारखी मासळी किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज ज्येष्ठ मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला. स्थानिक मालवणी भोजनाचा आस्वाद घेतानाच रविवारी मालवणात प्रत्यक्षात मासळी पकडण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरली.