कोकणातलं असं सौंदर्य तुम्ही पाहिलं आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 17:42 IST2018-08-22T17:37:55+5:302018-08-22T17:42:42+5:30

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे...अर्थात या कवितेप्रमाणेत श्रावणात अल्हाददायक वातावरण असतं. (सर्व छायाचित्र - वैभव केळकर)
श्रावण महिन्यात कोकणातील धरती मातेनं हिरवाईचा शालू पांघरलेला असतो.
ऊन-पावसाच्या खेळात निसर्गाचं विलोभनीय दृष्य पाहताना अचंबित व्हायला होते.
दक्षिण कोकणातील दोन जिल्हे असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला निसर्गानं भरभरून दिलं आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणातील दोन जिल्हे विभागणा-या सुखनदी परिसरातील विहंगम चित्रे कॅमे-यात कैद करण्यात आळी आहे.