कणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विजयाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 16:04 IST2018-04-12T16:04:43+5:302018-04-12T16:04:43+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह 17 पैकी 11 जागांवर विजय मिळत निर्विवाद बहुमत मिळवले.
या विजयानंतर स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कणकवली जोरदार जल्लोष केला.
या विजयाचे एक शिल्पकार असलेल्या आमदार नितेश राणे यांना कार्यकर्त्यांनी अक्षरश: उचलून घेतले.
नितेश राणेंनीही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा फोटो उंचावून समर्थकांचे अभिवादन स्वीकारले.