भारीच! कचरा अन् भंगारापासून पठ्ठ्यानं बनवला भन्नाट स्टुडिओ; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् By manali.bagul | Published: December 15, 2020 06:21 PM 2020-12-15T18:21:29+5:30 2020-12-15T18:32:18+5:30
आयटी विभाग आणि आयटीडीएच्या संयुक्त विद्यमानाने उत्तराखंडची राजधानी डेहरादूनमध्ये एक स्टुडीओ तयार करण्यात आला आहे. या स्टुडिओमध्ये असलेली एक बाईक भंगार आणि इलेक्ट्रोनिक वेस्ट पासून तयार करण्यात आली आहे.
कॅम्प्यूटर, मॉनिटर, बॅटरी, चिप्स यांसारख्या घटकांचा वापर करून ही बाईक तयार केली आहे. या स्टुडिओच्या छतावर डिव्हीडीचा वापर करून डेकोरेशन करण्यात आलं आहे.
आयटीडीएचे निर्देशक आयपीएस अमित सिन्हा यांची ही संकल्पना होती. सुरूवातील आयटीच्या सुधांशु नावाच्या विद्यार्थ्याला ही कल्पना आवडली त्यानंतर काम सुरू झाालं. या स्टुडिओचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यां तयार करण्यासाठी इंटरनेटच्या तारांचा वापर करण्यात आला होता.
खासकरून या स्टुडिओमध्ये इ वेस्ट पासून तयार झालेले कॅन्टीनसुद्धा आहे. या स्टुडिओचे छत तयार करण्यासाठी जवळपास १ लाख खराब डिव्हीडीचा वापर करण्यात आला होता.
या स्टुडिओजवळ ई वेस्ट डोनेशन बॉक्ससुद्धा ठेवण्यात आला आहे. या बॉक्सचा वापर करून तुम्ही त्यात कचरा भरू शकता.