Artist turning waste material to animal sculptures
प्लॅस्टिकचा असाही वापर होऊ शकतो हे दाखवून दिलं 'या' कलाकाराने... By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:52 PM2019-11-27T15:52:04+5:302019-11-27T16:01:14+5:30Join usJoin usNext कामी न येणारं प्लॅस्टिक लोक रस्त्यावर फेकून देतात. त्याने पर्यावरणाचं किती नुकसान होतं हे ओरडून ओरडून सांगण्याची वेळ आता आली आहे. कारण प्लॅस्टिक नष्ट होत नाही. तसेच यामुळे जनावरांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. हे प्लॅस्टिक नष्ट करण्याऐवजी याचा वापर करण्याची एक भन्नाट कल्पना पोर्तुगालचा आर्टिस्ट Artur Bordalo याने शोधून काढली आहे. त्याने 'Big Trash Animals' आर्ट वर्कच्या माध्यमातून प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या जनावरांच्या प्रतिमा सादर केल्या आहेत. (Image Credit : scoopwhoop.com)टॅग्स :जरा हटकेकलाJara hatkeart