Beware! If you touch any object in this village...
खबरदार! या गावात कोणत्याही वस्तूला हात लावाल तर... By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:58 PM2019-05-09T12:58:41+5:302019-05-09T13:02:13+5:30Join usJoin usNext भारतात रहस्यांनी भरलेले अनेक किस्से ऐकायला मिळतील. देशातील अनेक अशी शहरं आहेत ज्यांचे विविध किस्से तुम्ही कधी ऐकलेही नसतील. भारतातील एक असचं गाव ज्याचं रहस्य तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल. हिमाचल प्रदेशातलं हे मलाणा गाव आहे. देशातील रहस्यमय अशाठिकाणांमध्ये या गावाचं नाव घेतलं जातं. या गावात राहणारे लोकं बाहेरच्या लोकांपासून अतिशय सावध राहतात. इतकचं नव्हे तर बाहेरच्या लोकांसाठी या गावात विशेष नियम आणि कायदे बनविण्यात आले आहेत. हे कायदे बाहेरच्यांना तंतोतत पाळावे लागतात. या गावात बाहेरुन कोणी माणूस गेला आणि गावात असणाऱ्या कोणत्याही वस्तूला हात लावला तर त्याला दंड भरावा लागतो. हा दंड जवळपास 1 हजार रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत असतो. फक्त वस्तूच नाही तर गावातील कोणत्याही माणसाला स्पर्श करायचं नाही असा नियम आहे. गावात रहस्यमयरित्या भितींवर हाडे आणि खोपडी लटकलेली पाहायला मिळते. हे सांगाडे कोणत्याही माणसाचे नसून जनावरांचे आहेत. बळी दिलेल्या जनावरांचे सांगाडे लटकलेले असल्याने बाहेरुन आलेल्या माणसांसाठी ते आकर्षित करतात. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी हे कायदे बनविण्यात आले आहेत. टॅग्स :हिमाचल प्रदेशHimachal Pradesh