Bihar assembly election bjp mla jawahar prasad not wear footwears due to corona
कोरोना संकट टळेपर्यंत 'अनवाणी' राहणार, भाजपाच्या माजी आमदाराची शपथ By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:07 PM2020-09-01T17:07:13+5:302020-09-01T17:17:53+5:30Join usJoin usNext बिहार विधानसभेची निवडणूक या वर्षाच्या शेवटी होणार आहे. निवडणूकांच्या आधीच राजकिय पक्षाचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. अशा स्थितीत एका माजी आमदारानं अणवाणी पायांनी राहण्याची शपथ घेतली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून चप्पल न घालता हा आमदार वावरत आहे. जवाहर प्रसाद असे या आमदाराचे नाव आहे. जवाहर प्रसाद सासाराम विधानसभेसाठी ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या हा आमदार भारतीय जनता पक्षात आहे. जवाहर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चपासून अणवाणी पायांनी आहेत. जोपर्यंत कोरोनाचं संकट पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत अनवाणी पायांनी वावरायचं त्यांनी ठरवलं आहे. संपूर्ण गावात आणि गावाबाहेरही सासाराम अणवाणी पायांनी फिरतात. जवाहर प्रसाद यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षानं पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. सध्या निवडणून जवळ आल्यानं लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असे स्टंट करत असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबिहारसोशल व्हायरलजरा हटकेcorona virusBiharSocial ViralJara hatke