The cave man became internet sensation after began to document holistic off the grid lifestyle
गुहेत राहणारा बनला सेलिब्रिटी, परदेशी महिला येतात त्याला भेटायला! By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 03:24 PM2018-10-06T15:24:55+5:302018-10-06T15:33:09+5:30Join usJoin usNext थायलंडमध्ये स्वत:ला 'केव्ह मॅन' सांगणाऱ्या एक व्यक्तीचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहेत. लोथरियो चतुपूम लोसिरी नावाच्या व्यक्तीने गुहेत थांबायला आलेली प्रेयसी आणि इतर महिलांसोबतचे फोटो फेसबुकवर शेअऱ केले आहेत. स्थानिक लोकांनी परदेशी महिलांसोबत या गुहेत राहण्यावरुन या व्यक्तीवर टीकाही केली आहे (सर्व फोटो- Facebook/The Cave Man 2018) लोसिरी थायलंडमध्ये प्रसिद्ध कोह फान्गन आयलंडवर एका गुहेत राहतो. सोशल साईटवर या व्यक्तीला अनेकांनी रोमॅंटिक म्हटले आहे. गुहेमधील महिलांसोबतचे फोटो समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. पण गुहेमध्ये काहीही आपत्तीजनक आढळून आलं नाही. ४७ वर्षीय व्यक्तीने रशियातील एका महिलेसोबत असलेल्या आपल्या संबंधांबाबत सोशल मीडियात सांगितले होते. त्यानंतर स्थानिक लोकांनी या व्यक्तीला आयलंडवरुन दूर करण्याची मागणी केली होती. लोसिरी स्वत:ला केव्हमॅन म्हणवून घेतो आणि फेसबुकवर पर The Cave Man 2018 नावाच्या पेजवर आपले दैनंदिन फोटो शेअर करत असतो. केव्हमॅनने एका महिलेसोबतची प्रेम कहाणी शेअर केली होती तेव्हा त्या पोस्टला ९ हजार लोकांनी शेअर केले होते. पण नंतर टिकाही झाली होती. त्यामुळे त्याने ती पोस्ट डिलीट केली होती. या व्यक्तीने सांगितले की, कशाप्रकारे त्याने परदेशी महिलांना आपल्या गुहेत बोलवले आणि त्यांच्या सुंदरतेचं कौतुक केलं. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षात अनेक परदेशी महिला या गुहेत राहून गेल्या. स्थानिक लोकांनी केव्हमॅनवर असभ्य असल्याचे आरोप लावले आहेत. लोथरियो चतुपूम लोसिरी साधारण तीन वर्षांपूर्वी गुहेत शिफ्ट झाला होता. त्याचं म्हणनं आहे की, गुहेत जीवन जगण्यासाठी त्याने स्वत: अनेक वस्तू तयार केल्या आहेत. टॅग्स :सोशल व्हायरलथायलंडSocial ViralThailand