Corona virus : Viral things on corona virus that makes you laugh myb
Corona virus : कोरोनापेक्षाही जास्त चर्चेच आहेत 'या' व्हायरल गोष्टी, पहाल तर खळखळून हसाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 09:50 AM2020-03-20T09:50:26+5:302020-03-20T10:36:41+5:30Join usJoin usNext भारतात कोरोना मोठ्या प्रमाणाच पसरत असताना लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. असं असताना देखिल कोरोना व्हायरसविषयी सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरस होत आहेत. कोरोना व्हायरसमुळे ताण-तणावाखाली असताना या मिम्समुळे लोक खळखळून हसले. असेच काही मीम्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ते पाहून तुम्ही नक्की हसाल. मॅट डेमॉन, केट विन्स्लेट आणि जूड लॉ स्टारर 2011 मधील Contagion हा चित्रपट गेल्या काही दिवसात व्हायरल झाला आहे. . या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी देखील व्हायरल होत आहेत. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये पँडेमिक परिस्थितीबाबत वर्णन केलेले आहे. सोशल मीडिया साइट्सवर गो कोरोना असा हॅशटॅग देखील ट्रेंडिंग आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यावर अनेक मीम्स देखील बनवण्यात आले आहेत. वाराणसीच्या खोजवा भागात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्त्री या चित्रपटाच्या धर्तीवर घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. जसं स्त्री मध्ये अनेकांच्या घराबाहेर लिहिलेलं होत की, ‘ओ स्त्री कल आना’ तसंच या घराबाहेर लिहिलं आहे की, ‘ओ कोरोना कल आना’. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कोरोनाव्हायरस पॉर्न ऐकायला जरी विचित्र वाटत असेल तरी हे व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहेत. कोरोना व्हायरस या नावाखाली पॉर्नहब तसंच xHamster या साइटवर अडल्ट कंटेट आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने कोरोनाला पळवण्यासाठी गोमूत्र पार्टीचे आयोजन केले होते. गोमूत्र प्यायल्याने भयंकर कोरोना बरा होतो, असा या महासभेतील सदस्यांचा दावा आहे.टॅग्स :सोशल व्हायरलSocial Viral