Coronavirus: 20,000 Empty Chairs Set up to Honour COVID-19 Victims in The United States
खुल्या मैदानात ठेवलेल्या 'त्या' २० हजार रिकाम्या खुर्च्यांचे रहस्य तरी काय?; फोटो व्हायरल By प्रविण मरगळे | Published: October 7, 2020 06:38 PM2020-10-07T18:38:30+5:302020-10-07T18:48:02+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडलं, अमेरिकेसारख्या विकसित देशालाही याचा फटका बसला, जगभरात दीड कोटीहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले, अनेकांचे मृत्यू झाले, त्यामुळे कोरोनाची धास्ती सर्वसामान्यांच्या मनात बसली सध्या सोशल मीडियात रिकाम्या खुर्च्यांचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्याच युजर्सना एका पार्कमध्ये इतक्या खुर्च्या रिकाम्या का ठेवल्या आहेत? असा प्रश्न पडत असल्याने ते हैराण झाले आहेत. शनिवारी अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी पीडितांच्या सन्मानासाठी २० हजार खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या. अमेरिकेत आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे. तथापि, तेथे संक्रमित लोकांची संख्या ७० लाखांवर पोहोचली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना बाधित देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. युजर्सने या रिक्त खुर्च्यांवर आपल्या मित्रपरिवारातील जे कोणी कोरोनामुळे मृत्यू झाले, त्यांचे फोटो पोस्ट करीत आहेत. हा फोटो पोस्ट करताना एका युजर्सने लिहिलं की या सर्व खुर्च्या भरल्या पाहिजे होत्या, दुर्दैव, आता त्या रिक्त आहेत. दुसर्या सोशल मीडिया युजर्सने हा फोटो शेअर करत लिहिले की, आज राष्ट्रीय कोविड -१९ चा स्मृतिदिन आहे. अमेरिकेत २० हजार रिकाम्या खुर्च्या २ लाख ९ हजारांहून अधिक लोकांच्या जीवनाचा सन्मान करत आहेत. यातील सर्वांचे डोळे व्हाईट हाऊसवर आहेत. हा फोटो ट्विट करताना अनेक युजर्सने भावनिक प्रतिक्रियाही दिल्या आहेत, एकाने लिहिले की कोरोनामुळे आपल्या सर्वांची प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे, त्याच्या सन्मानार्थ असलेल्या या रिक्त खुर्च्या आपल्याला त्याची आठवण करून देतात. ग्रॅमी पुरस्कारप्राप्त गायक डीओन वॉरविक यांनी सांगितले की, या खुर्च्या गेल्या सहा महिन्यांत २ लाखाहून अधिक आयुष्यांच्या अकल्पनीय व मनातील वेदनांचा एक भाग म्हणून आहेत. डीओन्ने वॉरविक या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक होते. ते म्हणाले की, संसर्गातून वाचलेल्या सर्व लोकांचा आणि आणि सर्व अमेरिकन लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आता आली आहे. जगातील चार टक्के लोक अमेरिकेत राहतात. तर, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या एकूण मृत्यू जगभरातील मृत्यूंपैकी २० टक्के आहेत. या देशात संक्रमणाची गती खूप वेगवान आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमेरिकाcorona virusAmerica