कोरोना गो! कोरोना व्हायरसच्या कॉलर ट्यूनला वैतागले लोक, दु:खात करू लागले भन्नाट जोक! By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 03:44 PM 2020-03-18T15:44:34+5:30 2020-03-18T16:12:36+5:30
लोकांनी त्यांचं दु:खं सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. लोकांना हा विषय गंभीर वाटत नाही असं नाही, पण त्यांनी त्यांच्या भावना गमतीदारपणे व्यक्त केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या सगळीकडे गंभीर वातावरण आहे. कोरोनापासून बचावासाठी वेगवेगळे उपाय सतत सांगितले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे मोबाइलवर कुणालाही फोन केला तर तुम्हाला कोरोनाबाबत सूचना ऐकायला मिळतात. खरंतर ही माहिती महत्वाची आहे. पण लोक आता याला वैतागले आहेत. असं आम्ही नाही तर लोक सांगत आहेत. तेही सोशल मीडियावर.
लोकांनी त्यांचं दु:खं सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. लोकांना हा विषय गंभीर वाटत नाही असं नाही, पण त्यांनी त्यांच्या भावना गमतीदारपणे व्यक्त केल्या आहेत.