Coronavirus: वुहानमधील ‘या’ लॅबमध्येच कोरोना विषाणू बनवल्याचा दावा; इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचं रहस्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:10 PM2020-04-16T18:10:23+5:302020-04-16T18:18:33+5:30

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले आहे. या विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या २० लाख ८३ हजारांवर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण १ लाख ३४ हजार १६१ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २८ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेने चीनवर वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे हा विषाणू निर्माण करुन जगभर पसरल्याचा आरोप केला आहे

वुहानमध्ये दोन मोठ्या लॅब आहेत. दुसर्‍या प्रयोगशाळेचे नाव वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल असे आहे. अमेरिकेतील आपले वैज्ञानिक अमेरिकन शास्त्रज्ञांपेक्षा बरेच पुढे आहेत हे अमेरिकेला दाखवण्यासाठी चीनने कोरोना विषाणू या प्रयोगशाळांमध्ये विकसित केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, चीनला या विषयावर सत्य मांडले पाहिजे. त्याचवेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही बुधवारी सांगितले की वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजीच्या प्रयोगशाळेत चमगाडीवर हा प्रयोग केला जात होता की नाही हे शोधण्याचा अमेरिका प्रयत्न करीत आहे

अत्यंत शक्तिशाली सूक्ष्मदर्शकासह कोरोना विषाणू दिसू शकतो. हा व्हायरस अशाप्रकारे दिसू शकतो. एका विशिष्ट हेतूने चीनने हा व्हायरस बनवला असा अमेरिकेला संशय आहे.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे काम करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिक. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना अनेक प्रकारची उपकरणे वापरावी लागतात

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे वैज्ञानिक प्रयोगात गुंतलेले असतात. येथे काम करणार्‍यांना अत्यंत कडेकोट सुरक्षेत राहावं लागतं.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात गुंतलेली एक वैज्ञानिक. हे शास्त्रज्ञ अनेक प्रकारच्या सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहेत.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे प्रयोग म्हणून काम करणारे दोन शास्त्रज्ञ. या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणू बनविला असा दावा केला जातो.

ही वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे. चीनमधील सर्वात मोठी संशोधन संस्था आहे. असा दावा केला जातो की, याच संस्थेत कोरोना व्हायरस तयार झाला होता. त्यानंतर तो जगभरात पसरला आहे.

प्रयोगशाळेतली प्रत्येक कामे अत्यंत गुप्त मार्गाने केली जातात. तेथून कोणतीही माहिती मिळवणे सोपे नाही.

अमेरिकेच्या लष्कराचे सहप्रमुख जनरल मार्क माईल यांनी व्हर्जिनिया येथे पत्रकार परिषदेत बोलताना चीनने कोरोनाबद्दलचे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे असा आरोप केला.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही चीनमधील सर्वात मोठी संस्था आहे. ती तयार करण्यासाठी 15 वर्षे लागली आणि कोट्यवधी रुपये खर्च झाले.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथील प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात गुंतलेली एक वैज्ञानिक. हे शास्त्रज्ञ अनेक प्रकारच्या सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहेत.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी उशिरा कोरोनाच्या धोक्याबद्दल इतर देशांना माहिती दिली असल्याचे अमेरिकेचा आरोप आहे.