Coronavirus: coronavirus could not enter in italy village with magical water pnm
Coronavirus: इटलीत कोरोनाने घेतले १३ हजार बळी; पण ‘या’ गावात ‘जादूची विहीर’ वाचवते लोकांचा जीव? By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:14 PM2020-04-02T14:14:36+5:302020-04-02T14:20:45+5:30Join usJoin usNext इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे जवळपास १३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. १ लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनामुळे इटलीत दहशतीचं वातावरण आहे. इटलीत डॉक्टरांचा मृत्यू होत आहे. दररोज शेकडो लोक मारले जात आहेत मात्र इटलीमध्ये असं एक गाव आहे, जिथे कोरोना विषाणू पोहोचलेला नाही. इथले सर्व लोक सुरक्षित आहेत. मोन्टॅल्डो टॉरिनीस असं या जागेचे नाव आहे. हे गाव इटलीच्या पूर्वेकडील पियोदमॉन्ट येथील ट्युरिन शहरात येते. येथील लोकांना असा विश्वास आहे की गावाच्या शुद्ध पाणी आणि हवेमुळे येथे कोरोना आला नाही हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल लोक म्हणतात की या गावात जादूचं पाणी आहे. म्हणूनच कोरोनाचे एकही प्रकरण अद्याप समोर आलं नाही. सन १८०० मध्ये नेपोलियन बोनापार्टच्या सैनिकांचा न्यूमोनिया या पाण्यातून बरा झाला. १८०० मध्ये जून महिन्यात नेपोलियनच्या सैन्याने येथे तळ ठोकला होता. मोन्टॅल्डो टॉरिनीस गाव ट्युरिन शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. ट्यूरिन शहरात कोरोनाचे ३६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. पियोदमॉन्टची परिस्थिती गंभीर आहे. येथे कोरोना विषाणूमुळे ८२०० हून अधिक लोक बाधित आहेत. पण मॉन्टाल्डो टॉरिनीसमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. ट्यूरिन शहरातील मोन्टॅल्डो टॉरिनीस येथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. या गावातल्या विहिरीतील पाणी पिल्याने नेपोलियनच्या सैन्यांचा न्यूमोनिया बरा केल्याची दंत कथा या लोकांमध्ये आहे. पियोदमॉन्टच्या मेयर सर्गेई गियोटी म्हणाल्या की मोन्टॅल्डो टॉरिनीसची स्वच्छ हवा व विहीर पाण्यामुळे नेपोलियनचे सैन्य बरे झाले. या विहिरीच्या पाण्यामुळे अजूनही याठिकाणी लोक सुरक्षित आहेत. सर्गेईने सांगितले की या गावातील बरेच लोक ट्युरिन शहरात जातात. ट्युरिनमध्ये कोरोनाचा संसर्ग खूप आहे. पण तेथून परत आल्यानंतरही या गावातील लोक निरोगी आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. असं असूनही मेयर सेर्गेई यांनी मॉन्टल्टो टॉरिनीस गावात मास्क आणि सॅनिटायझर्सचे वितरण केले आहे. कोरोना विषाणूबाबत लोकांना जागरुक ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. माँटलॅडो टोरीनीस गावात एकूण ७२० लोक राहतात. सर्गेई म्हणाल्या की इथल्या लोकांची जीवनशैली अत्यंत सामान्य आणि आरोग्यदायी आहे. इथले लोक कोणत्याही प्रकारे अस्वच्छतेशी तडजोड करीत नाहीत. मग ते स्वतःचे किंवा गाव असो. स्वच्छतेची पुरेपुर काळजी घेण्यात येते. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइटलीcorona virusItaly