Coronavirus: How Long Survive In Surfaces Shoes Plastic Stainless Steel research pnm
Coronavirus: बूट घालाल तर व्हाल कोरोनाचे शिकार; ‘इतके’ दिवस जिवंत राहतो विषाणू – रिसर्च By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:30 PM2020-03-29T15:30:14+5:302020-03-29T15:35:09+5:30Join usJoin usNext जगभरात वाढणाऱ्या कोरोनामुळे अनेक लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सध्या जगात साडेसहा लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर ३० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या व्हायरसने अनेक देशातील नागरिकांना विळख्यात घेतलं आहे. चीनला मागे टाकत अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या १ लाख २० हजारांहून जास्त झाली आहे. वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोनाची धास्ती सर्वसामान्यांनी घेतली आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्हची नवीन आकडेवारी समोर येत आहे. तर मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता आणि सोशल डिस्टेंसिंग तसेच बाजारातून वस्तू आणतानाही काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग बुटाच्या माध्यमातून पसरतो असंही एका संशोधनातून समोर आले आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया संशोधन अभ्यासानुसार बुटाच्या सोलमध्ये देखील बॅक्टेरिया, बुरशी आणि व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. शूज सोलमध्येही कोरोना विषाणू पाच दिवस जिवंत राहू शकतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञ म्हणतात की कोरोना विषाणू पाच दिवसांपर्यंत बुटांच्या सोलमध्ये जिवंत राहतो, विशेषत: सुपर मार्केट, वाहतूक किंवा रुग्णालये अशा सार्वजनिक भागातील जे लोक बूट वापरतात त्यांच्यासाठी धोकादायक आहे. व्हायरस बुटांमध्ये कसा पोहचतो? कोरोना संक्रमित व्यक्ती शिंकल्याने किंवा खोकल्यामुळे त्याच्या तोंडातून थेंब किंवा द्रव कणांद्वारे हा विषाणू पसरवितो. खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हवेत पसरलेले थेंब जमिनीवर किंवा बुटांवर, लेसवर पडले तर तो विषाणू बुटांद्वारेही पसरू शकतो. शूज सोल टिकाऊ सिंथेटिक मटेरियलपासून बनविलेले असतात. म्हणजे रबर, पीव्हीसी आणि लेदर प्लास्टिक इ. हवा, द्रव किंवा ओलावा या पदार्थांमधून जाऊ शकत नाही, म्हणून त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा व्हायरस राहण्याची शक्यता आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये असा दावाही केला गेला आहे की कार्डबोर्डमध्ये कोरोना विषाणू 24 तास जिवंत राहतो. तथापि, हे वातावरणाच्या तापमानावर देखील अवलंबून असते. अभ्यासानुसार, प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर कोरोना विषाणू दोन ते तीन दिवस जिवंत राहतात, तर शूजमध्ये वापरलेली कृत्रिम सामग्रीत पाच दिवस जगू शकते. या अभ्यासाला कॅन्सस सिटी पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट करोल आणि इतर तज्ञांचे पाठबळ आहे. कृत्रिम साहित्य आणि प्लास्टिक शूज सक्रिय व्हायरस जिवंत ठेवू शकतात असं त्यांचे म्हणणं आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, कोरोना संक्रमित सार्वजनिक ठिकाणीहून परतल्यानंतर घराच्या दाराजवळ शूज काढून टाकले पाहिजेत. शॉपिंग मॉल्स किंवा बाहेर काम करणारे लोक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना असं करण्यास सांगितले जाते. जोपर्यंत लोकांना योग्य उपचार मिळत नाही तोपर्यंत कोरोना विषाणूपासून बचाव इतकाचं एकमेव पर्याय आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus