Coronavirus : कनिका कपूर ठरली 'कमोनिका', योगी आदित्यनाथांनीही उरकलं तिचं नामकरण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:11 PM 2020-03-21T15:11:28+5:30 2020-03-21T15:25:09+5:30
Coronavirus : कनिका कपूर(Kanika Kapoor) ज्याप्रकारे बेजबाबदारपणे वागली त्यामुळे लोक तिच्यावर नाराज आहेत. त्यावरून सोशल मीडियात अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर गायिका कनिका कपूर सोशल मीडियात ट्रेन्डींग टॉपिक झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यावर ती अनेकांच्या संपर्कात आली. कनिका ज्याप्रकारे बेजबाबदारपणे वागली त्यामुळे लोक तिच्यावर नाराज आहेत. त्यावरून सोशल मीडियात अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.
कनिका 20 मार्चला इन्स्टाग्राम लिहिले होते की, 'गेल्या 4 दिवसांपासून मला फ्लू सारखं वाटत आहे. मी टेस्ट केली तर मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. मी आणि माझ्या परिवाराने स्वत;ला आयसोलेट केलं आहे. 10 दिवसांआधी मी लंडनहून परतले तेव्हा दिल्ली एअरपोर्टवर माझी थर्मल स्क्रीनिंगही झाली होती. पण याची लक्षणे चार दिवसांआधी समोर आलेत'.
ती 9 मार्चला लंडनवरून परतली आणि स्वतःला आइसोलेशनमध्ये ठेवले नाही. तिने बऱ्याच पार्टी अटेंड केल्या. शुक्रवारी असे वृत्त समोर आले की तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बॉलिवूडपासून सामान्य लोकांनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेले पहायला मिळाले.