A country where metro travel is free, but only this work is required
एक असा देश जिथे मेट्रो प्रवास मोफत, पण करावं लागणार फक्त 'हे' काम By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 02:48 PM2019-07-07T14:48:09+5:302019-07-07T15:19:46+5:30Join usJoin usNext दिल्लीत महिलांना मेट्रो प्रवास मोफत दिल्यानंतर दिल्ली सरकार नव्या योजनेवर काम करत आहे. तर दुसरीकडे रशियातल्या मॉस्कोमधील एका मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात लोकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे. मोफत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त 30 उठाबशा काढाव्या लागणार आहेत. लोकांचं आरोग्य सृदृढ राहण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. इथे मोफत तिकीट मिळवण्यासाठी लोक उठाबशा काढतात. सोशल मीडियावर अनेक युजर्सनं यासंदर्भातला फोटो शेअर केले आहेत.