नाद खुळा! 'भाऊं'च्या जुन्या फोटोंचा फेसबुकवर दंगा, हे भन्नाट जोक्स वाचून म्हणाल पिंगा गं पोरी पिंगा... By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:54 AM 2020-04-01T11:54:23+5:30 2020-04-01T12:09:01+5:30
लॉकडाऊनदरम्यान फेसबुकवर यूजर्सनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे जुने फोटो उकरून काढण्यास आणि त्यावर मजेदार चारोळ्या, कविता आणि जोक कमेंट करण्यास सुरू केली आहे. त्यातीलच काही भन्नाट जोक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर, पोरी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker....
हाताची घडी तोंडावर बोट, पोरी आमच्या भाईकडे बघून चावतात ओठ!
पेढे बनवण्यासाठी लागतो खवा, पेढे बनवण्यासाठी लागतो खवा, भाऊंना बघून पोरी म्हणतात मला हाच चिकणा हवा....
कोरोनाच्या बातम्या बघून जीव होतो कावराबावरा.. लॉकडाऊन परवडलं, पण जुन्या, फोटोंवरच्या कविता आवरा...
पांढऱ्या पट्ट्याचा प्राणी असतो झेब्रा, सगळ्या पोरी म्हणतात मी याची नागिन अन हा माझा कोब्रा...
मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस... पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस....
भाऊंना बघून खूप बनल्या असतील कविता, पोरी म्हणता तू माझा जेठालाल अन मी तुझी बबिता...
जीरा राईस मध्ये असतो जिरा... भाऊ ने फोटो टाकला की पोरी म्हणतात हाच आमचा कोहिनूर हिरा....
हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे... भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे...
आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे...
दूध पाहिजे लोकांले, आपल्याला पाहिजे साय, दूध पाहिजे लोकांले, आपल्याला पाहिजे साय, भाऊला पाहून वैनी म्हणतात, हाय हुकू हाय हुकू हाय हाय....
खुलता कळी खुलेना खुलता कळी खुलेना, आन भाऊंच्या मनात काये काईच कळेना....
बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना ... मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना....
घरात बसून भाऊंनी घेतला उंच झोका, आणि भाऊंना पाहून ती म्हणाली हाच माझा बोका..
नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या, जशी भाउंची एंट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या आला गं माझा बबड्या, आला गं माझा बबड्या....
थंड तेलात भजी काही तळेना, भाऊपेक्षा Handsome पोरींना कोणी मिळेना....
दारूच्या नादात मोकळा झाला खीसा, भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात, जीव झाला येडापिसा...
चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी भाऊला बघून पोरी म्हणतात, तू माझा बाजीराव मी तुझी मस्तानी...