'Flowers' can not be found anywhere in the world only in Manipur
संपूर्ण जगात 'हे' फुल कुठेही सापडणार नाही ते फक्त आढळतं मणिपुरमध्येच! By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:23 PM2019-08-28T16:23:57+5:302019-08-28T16:27:30+5:30Join usJoin usNext मणिपूरमध्ये 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान शिरुई लिली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश दुर्मिळ असलेल्या शिरुई लिली या फुलाचं रक्षण करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजन केलं जातं. तसेच उखरूलमधील पर्यटन वाढविण्यासही मदत होणार आहे. या फेस्टीवलचं आयोजन राज्य पर्यटन विभागाकडून केलं जातं. हा महोत्सव 5 दिवसांसाठी आयोजित केला जातो. उखरूल हा मणिपूर राज्यातील सर्वात उंचीवर असणारा जिल्हा आहे. हे शिरुई फुल उंचावरील डोंगरावर आढळून येतं. हे फुल फक्त जगात मणिपूरमध्ये आढळून येतं. या दुर्मिळ फुलाचा शोध फ्रैंक एफ किंग्डम नावाचे ब्रिटिश वनपतीशास्त्रज्ञ यांनी 1946 मध्ये लावला होता. त्यापूर्वी शिरूई लिली नावाच्या फुलाची माहिती कोणालाही नव्हती. 1948 मध्ये लंडनमधील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीने शिरुई लिली फुलाला मेरिट प्राइजने गौरविण्यात आलं होतं.