Former England player Alex Hartley has become the first female coach in the Pakistan Super League
PHOTOS: पाकिस्तान सुपर लीगमधील पहिली महिला कोच; 'सौंदर्याची खान' देते गोलंदाजीचे धडे By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 04:55 PM2024-03-19T16:55:38+5:302024-03-19T17:00:24+5:30Join usJoin usNext पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम विविध कारणांनी चर्चेत राहिला. पाकिस्तान सुपर लीगचा यंदाचा हंगाम शादाब खानच्या नेतृत्वातील इस्लामाबाद युनायटेडने जिंकला. सोमवारी मुल्तान सुल्तान आणि इस्लामाबाद यांच्यात सामना झाला. पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम विविध कारणांनी चर्चेत राहिला. प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ आणि स्टेडियममधील दुरावस्था लक्ष वेधून गेली. उपविजेत्या मुल्तान सुल्तानच्या संघाला धडे देणारी आणि प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणारी ॲलेक्स हार्टले सध्या चर्चेत आहे. ती पाकिस्तान सुपर लीगमधील पहिली महिला प्रशिक्षक ठरली आहे. ॲलेक्स हार्टले मुल्तानच्या संघाची गोलंदाजी प्रशिक्षक आहे. इंग्लंडची माजी खेळाडू ॲलेक्स तिच्या ग्लॅमरस लूकने देखील चाहत्यांना आकर्षित करते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ३० वर्षीय ॲलेक्स हार्टले मुल्तान सुल्तानच्या गोलंदाजांना गोलंदाजीचे धडे देते. ॲलेक्सची क्रिकेट कारकीर्द फार मोठी नव्हती. तिने २०१६ ते २०१९ या कालावधीत इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने इंग्लिश संघासाठी २८ वन डे आणि ४ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मोहम्मद रिझवानच्या मुल्तान सुल्तान संघाला पुन्हा एकदा उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानात आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते. टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडPakistanEngland