बडे दिलवाला! रतन टाटा यांना सोशल मीडियावर मुलगी म्हणाली 'छोटू', त्यांनी दिलेल्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन....
By अमित इंगोले | Updated: January 15, 2021 12:02 IST2021-01-15T11:08:22+5:302021-01-15T12:02:44+5:30
रतन टाटा यांनी लिहिले की, एका इनोसंट महिलेने काल मला लहान मुल म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कधी आपल्या चांगल्या कामांमुळे तर कधी आपल्या जुन्या फोटोंमुळे देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतात.
आता पुन्हा एकदा त्यांच्या दिलदारपणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका मुलीने त्यांच्या फोटोवर अशी काही कमेंट केली होती की, लोक तिला ट्रोल करू लागले होते.
मात्र, नेहमी आपल्या दिलदारपणासाठी फेमस असलेल्या रतन टाटा यांनी तिच्या कमेंटला उत्तर देऊन सर्वांचं मन जिंकलं आहे.
टाटा ग्रुप ऑफ चेअरमनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यानिमित्ताने त्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर लोकांचे लाइक्स आणि कमेंटचा पाऊस आला होता.
तर एका मुलीने या रतन टाटा यांच्या फोटोवर 'छोटू' अशी कमेंट केली होती. त्यानंतर लोकांनी या मुलीला ट्रोल करणं सुरू केलं होतं.
इथे आपला दिलदारपणा दाखवत रतन टाटा यांनी मुलीचा ट्रोलर्सपासून बचाव केला आणि तिच्या कमेंटवर फार प्रेमाने उत्तर दिलं.
त्यांनी रिप्लाय केला की, 'आपल्या सर्वांमध्ये एका लहान मुलाचे गुण असतात. कृपया या मुलीचा आदर करा'. नंतर या मुलीने तिची कमेंट डिलिट केली.
रतन टाटा यांनी लिहिले की, एका इनोसंट महिलेने काल मला लहान मुल म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या या कमेंटमुळे त्या मुलीला लोकांकडून अपमान सहन करावा लागला. ज्यावरून हे दिसून येतं की, रतन टाटा यांना लोक किती पसंत करतात.
अखेर तिने आपली कमेंट डिलिट करणंच योग्य समजलं. रतन टाटा यांनी लिहिले की, ते तिच्या भावनात्मक नोटचा आदर करतात. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, ती मुलगी पुन्हा अशी कमेंट करेल.
रतन टाटा हे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इन्स्टाग्रामवर आले होते. फार कमी वेळात ते सोशल मीडियाच्या खेळात तरबेज झाले आहेत.