कोल्ड ड्रिंक्समध्ये आहे इबोला व्हायरस? WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 12:53 PM2024-08-24T12:53:31+5:302024-08-24T13:02:37+5:30

Cold Drink, Ebola Virus And Whatsapp : सोशल मीडियावर असाच एक मेसेज पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे, ज्या मेसेजमध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये इबोला व्हायरस असल्याचा मोठा दावा केला जात आहे.

WhatsApp वर विविध प्रकारचे प्रकारचे मेसेज हे दररोज व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा फेक मेसेज हे असतात. पण युजर्सना ते खरे वाटतात. पण प्रत्यक्षात सत्य वेगळंच असतं.

सोशल मीडियावर असाच एक मेसेज पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे, ज्या मेसेजमध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये इबोला व्हायरस असल्याचा मोठा दावा केला जात आहे.

मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की कोल्ड ड्रिंकमध्ये इबोला व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही ते पिऊ नका. हा मेसेज सरकारच्या नावाने फॉरवर्ड केला जात आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं आहे. सरकारने असा कोणताही इशारा दिलेला नाही, असं पीआयबीने स्पष्ट केलं आहे.

असे फेक मेसेज WhatsApp वर अनेकदा येतात. अनेक वेळा हॅकर्स याच संधीचा फायदा घेऊन तुम्हाला फसवू शकतात, जाळ्यात ओढू शकतात.

WhatsApp वर येणाऱ्या अशा मेसेजेसबाबत तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नेहमीच आलेल्या मेसेजचा सोर्स सर्वप्रथम व्हेरिफाय करा.

अनेक वेळा तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून हा मेसेज मिळेल. अशा दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी, तुम्ही त्या दाव्याबद्दल इंटरनेटवर शोधू शकता.

मेसेजसोबत येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका. असे करून तुम्ही फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू शकता. लिंकमध्ये काही मालवेअर देखील असू शकतात.

अनोळखी लिंकवर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका. तुम्हाला कोणताही संशयास्पद मेसेज मिळाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. नेहमी सतर्क राहा.