Ind Vs Eng : 'हिटमॅनशिवाय विजय कठीण' रोहितच्या फॅन्सकडून विराट कोहली ट्रोल, मीम्स व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 15:55 IST2021-03-13T15:48:36+5:302021-03-13T15:55:55+5:30

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने जे खेळाडू निवडले होते त्यात रोहित शर्मा नव्हता. त्याला आराम देण्यात आला होता.

शुक्रवारी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडीअमवर खेळण्यात आलेल्या टी-२० मॅचमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला ८ विकेटने मात दिली. यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा ट्रेन्ड करत आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने जे खेळाडू निवडले होते त्यात रोहित शर्मा नव्हता. त्याला आराम देण्यात आला होता. रोहित शर्माने टेस्ट सीरीजमध्ये इंग्लंड विरोधात चांगलं प्रदर्शन केलं होतं. टीम इंडियाच्या पराभवानंतर लोक कोहलीला ट्रोल करू लागले आणि रोहितच्या वापसीवर जोर देत आहेत.

शुक्रवारी मॅचमध्ये इंडियाने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १२४ रन काढले होते. तर इंग्लंडने १५.३ ओव्हरमध्ये २ विकेटवर १३० रन काढले. ५ मॅचच्या या सीरीजमध्ये त्यांनी १-० अशी आघाडी घेतली आहे.