Indian women have the most gold in the world, read here details
भारतीय महिलांकडे जगात सर्वाधिक सोनं! अमेरिका, रशिया, चीन कोसो दूर; वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:16 AM2024-06-24T11:16:59+5:302024-06-24T11:27:07+5:30Join usJoin usNext जगात कोणत्याच देशाकडे नाही इतकं सोनं भारतीय स्त्रियांच्या अंगावर. सोनं ही अशी गोष्ट आहे, ज्याचं जगभरातल्या लोकांना आकर्षण आहे. त्यातही भारत आणि भारतातल्या महिलांसाठी तर सोनं म्हणजे जीव की प्राण. भारतीयांसाठी सोनं म्हणजे नुसता दागिना नाही, अडीनडीला उपयोगी पडणारा आणि लगेच पैशांत रूपांतर करून देणारा धातू नाही, तर सोनं म्हणजे भारतीय महिलांसाठी संस्कृती आहे, संस्कार आहे. त्यामुळे कुठल्याही शुभमुहूर्तावर भारतातल्या महिला आवर्जून सोनं, दागिने खरेदी करतात. सध्या जगभरात सगळ्याच देशांकडून सोन्याचा साठा शासकीय स्तरावर वाढवला जात आहे. अमेरिकेकडे सध्या सुमारे ८१३३ टन सोनं आहे, जर्मनीकडे ३३६२ टन, तर सिंगापूरकडे १२७ टन. मार्च २०२४च्या आकडेवारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सुमारे ८२२ टन सोनं आहे; पण भारतीय महिलांकडे किती सोनं असावं? एका अभ्यासानुसार भारतीय महिलांच्या अंगावर २१,७३३ टन सोनं आहे! जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. कोणत्या देशातील महिलांच्या अंगावर किती सोनं? भारतीय महिला - २१, ७३३ टन, अमेरिका - ८१३३ टन, जर्मनी - ३३६२ टन, इटली - २४५१ टन, फ्रान्स - २४३६ टन, रशिया - २२९८ टन, चीन - १९४८ टन, सिंगापूर - १२७ टन. संदर्भ : फिनॉलॉजीटॅग्स :सोनंभारतGoldIndia