kazakhstan lake kaindy where the trees grow upside down
Lake Kaindy ची अजब-गजब दुनिया, तलावाच्या आत उलट्या दिशेने वाढतंय जंगल! By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:42 PM2019-03-23T16:42:38+5:302019-03-23T16:51:53+5:30Join usJoin usNext एखाद्या तलावाच्या आजूबाजूला तुम्ही अनेकदा वेगवेगळी झाडे पाहिली असतील. कधी कधी तलावात वरच्या बाजूने उगवलेली उंचच झाडेही पाहिली असतील. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की, एक असाही तलाव आहे ज्यात उलट्या दिशेने म्हणजेच तलावात खालच्या दिशेन झाडे वाढत आहेत. (Image Credit : journalofnomads यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला कझाकीस्तानातील सर्वात मोठ्या अलमाती शहरापासून ८० मैल दूर Kaindy तलावाजवळ घेऊन जात आहोत. खरंतर या फोटोंवर सहजासहजी विश्वास बसत नाही. पण हे खरंय. (Image Credit : blogspot) या तलावाच्या आत वाढणारी ही झाडे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. या झाडांची संख्याही इतकी आहे की, त्यांनी जंगलाचं रूप घेतलं आहे. १९११ मध्ये इथे एक भूकंप आला होता. तेव्हा एका लॅंडस्टाइडमुळे डोंगराचं तोंड बंद झालं होतं आणि तिथे एक नैसर्गिक डॅम तयार झाला होता. (Image Credit : aboutkazakhstan) त्यानंतर इतका पाऊस झाला संपूर्ण परिसर पाण्याखाली आला होता. भलेही तलावातील वर दिसणारे झाडे वाळली आहेत. पण जंगलातील पाण्यामुळे त्यांच्या बीया तशाच राहिल्या आणि या चमत्कारी तलावाचा रूप समोर आलं. (Image Credit : centralasiaheritage) हा तलाव समुद्र सपाटीपासून जवळपास २ हजार मीटर उंच आहे. हा तलाव हिवाळ्यात गोठतो. (Image Credit : tracydeephotography) https://www.youtube.com/watch?v=P1O_K7YWYtQ या लिंकवर तुम्ही या तलावाचा सुंदर नजारा बघू शकता.टॅग्स :व्हायरल फोटोज्जरा हटकेViral PhotosJara hatke