महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीनंतर, शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड केल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकारचे 'तख्त' तर हादरलेच, शिवाय शिवसेनेतही उभी फूट पडली आहे. कारण, एकनाथ शिंदेंसोबत एक-दोन नव्हे तर तब्बल 46 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. यात सेनेच्या आमदारांची संख्या मोठी आहे. यामुळे आता राज्यातील ठाकरे सरकारच्या भवितव्याचा पिक्चर क्लिअर झाला आहे. यातच खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने," असे ट्विटही केले आहे. राज्यातील या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. बघा मीम्स...