Memes: मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांना 'नो एन्ट्री', मीमकरांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची वाजवली 'घंटी'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 15:55 IST2021-04-26T15:38:15+5:302021-04-26T15:55:52+5:30
#Maldives Memes : सोशल मीडियावर #Maldives ट्रेन्ड होत आहे. ज्यानंतर लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवरून मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. कारण भारतात कोरोनाने थैमान घातलेलं असताना सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला जात गेले होते.

भारतात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे हॉंगकॉंग, कॅनडा, सिंगापूर आणि इराण सारख्या देशात व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून भारतातून येणाऱ्या फ्लाइट्सवर बंदी घातली गेली आहे. यात आता मालदीव्सचाही समावेश झाला आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रलायाने सोमवारी एक ट्विट करून माहिती दिली की, त्यांनी २७ एप्रिलपासून भारतातून मालदीवला येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #Maldives ट्रेन्ड होत आहे. ज्यानंतर लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवरून मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. कारण भारतात कोरोनाने थैमान घातलेलं असताना सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला जात गेले होते.