कॅप्टन असावा तर असा! लिओनेल मेस्सीने आपल्या टीमसाठी ३५ सोन्याचे आयफोन केले खरेदी, किंमत ऐकून बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:06 PM 2023-03-02T18:06:10+5:30 2023-03-02T18:32:44+5:30
लिओनेल मेस्सीने FIFA विश्वचषक २०२२ मधील विजय साजरा करण्यासाठी संपूर्ण संघाला iPhones भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेस्सीने डिझाईन केलेले गोल्ड कोट फोन मिळाले, ज्यावर खेळाडूंची नावे आणि जर्सी क्रमांक लिहिलेला आहे. लिओनेल मेस्सीने FIFA विश्वचषक २०२२ मधील विजय साजरा करण्यासाठी संपूर्ण संघाला iPhones भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेस्सीने डिझाईन केलेले गोल्ड कोट फोन मिळाले, ज्यावर खेळाडूंची नावे आणि जर्सी क्रमांक लिहिलेला आहे.
फिफा विश्वचषक २०२२ जिंकणारा कर्णधार लिओनेल मेस्सी सध्या चर्चेत आहे. मेस्सीने आपला चॅम्पियन संघ अर्जेंटिनाला एक खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. लिओनेल मेस्सीने २५ सोन्याचे आयफोन खरेदी केले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्व आयफोन्समध्ये संघातील खेळाडूंची नावे त्यांच्या जर्सी क्रमांक आहेत. विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात कर्णधार मेस्सीने आपल्या संघाला दिलेली भेट खरोखरच भन्नाट आहे.
मेस्सीने त्याच्या टीमसाठी डिझाईन केलेले आयफोन २४ कॅरेटचे आहेत. या सर्वांची किंमत देखील १.७३ कोटी रुपये आहे.
मेस्सीने ते आयडिझाइन गोल्ड नावाच्या कंपनीकडून बनवले आहे. मेस्सीने शनिवारीच हे आयफोन त्याच्या पॅरिसेटच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचवले होते.
पहिल्यांदाच बिगर युरोपीय संघाने विश्वचषक जिंकला होता. या विजयाच्या आनंदात मेस्सीने आपल्या संघाला अशी अनमोल भेट देण्याचा निर्णय घेतला.
लिओनेलला त्याचा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी काहीतरी करायचे होते, पण त्याला घड्याळासारखी सामान्य भेट नको होती. यासाठी त्याने उद्योगपती बेन लिओन यांच्याशी संपर्क साधून यावर चर्चा केल्याची माहिती मेस्सीने दिली.
२०२२ मध्ये झालेला फिफा वर्ल्डकप चांगलाच चर्चेत आला होता.
प्रत्येक आयफोनवर खेळाडूंची नावे आणि अर्जेंटिनाचा लोगो आहे. आयफोनवर खेळाडूच्या नावाव्यतिरिक्त त्याचा जर्सी नंबरही आहे. सोबतच त्यावर वर्ल्ड चॅम्पियन असेही लिहिले आहे.
ज्या iDesign मधून मेस्सीने हे फोन डिझाईन केले होते, त्यांनी असेही म्हटले आहे की, मेस्सी खूप चांगल्या ग्राहकांपैकी एक आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर काही महिन्यांनी तो आमच्याकडे आला.
कंपनीने पुढे सांगितले की, त्यांना या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष भेट हवी आहे. म्हणून आम्ही सुचवले की त्याच्या नावावर स्वतःचा आयफोन असावा, जो सोन्याचा असावा. त्यामुळे त्यांना ही कल्पना आवडली. मेस्सीने आपल्या संघाला दिलेल्या या अप्रतिम गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.