Fact Check : मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करतंय ७ लाख रुपये?; जाणून घ्या सत्य
By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 14:18 IST2020-11-17T19:52:05+5:302021-01-27T14:18:49+5:30

लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. लाखो लोकांच्या पगारात कपात करण्यात आली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं.
कोरोनामुळे घसरलेला अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅकेजची घोषणा केली.
देशातल्या विविध घटकांना, आर्थिक क्षेत्रांना मदत देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दिलासा देण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे.
एकीकडे सरकार अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात ७ लाख रुपये जमा करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोदी सरकार 'जीवन लक्ष्य योजने'च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ७ लाख रुपयांची मदत देत असल्याचं दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता तो खोटा असल्याची माहिती समोर आली. पीआयबीनं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.
नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून दूर राहावं, जागरूकता बाळगून अशा बातम्या फॉरवर्ड करू नयेत, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.