Most weird creatures in the world, Who you hardly know about
हे आहेत पृथ्वीवरील ८ विचित्र जीव, यांना पाहून म्हणाल, अरे बाप रे बाप! By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 01:20 PM2019-08-07T13:20:49+5:302019-08-07T13:25:50+5:30Join usJoin usNext जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे जीव-जंतू नेहमी आढळत असतात. यातील काही आपण पाहिलेले असतात, पण असेही बरेच असतात ज्यांना ना आपण पाहिलेलं असतं ना त्यांच्याबाबत काही माहीत असतं. आज आम्ही तुम्हाला असेच काही विचित्र जीव दाखवणार आहोत आणि त्यांच्याबाबत सांगणार आहोत. यांना बघून तुम्हीही म्हणाल 'देवाने काय काय तयार केलंय'. थॉर्नी डेविल नावाचा हा जीव ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात आढळतो. सरपटणारे हे कीडे मुंग्यांच्या वारूळाकडे डोळे लावून बसलेले असतात. हे मुंग्यांना त्यांच्या लांब जिभेने खेचून काढतात आणि खातात. हा आहे चालणारा मासा. मेक्सिकोमध्ये हा मासा आढळतो. हा आहे मासाच पण याला चार पाय आहेत आणि हा पोहण्याऐवजी पाण्यात जमिनीवर चालतो. काही तज्ज्ञ म्हणतात की, हा मासा नाही तर बेडकाची एक प्रजाती आहे. या जीवाला पाहून प्रश्न पडतो की, हा खेकडा आहे की, कोळी. मुळात हा जीव कोळी आणि खेकड्याचं मिश्रित रूप आहे. याला जपानमध्ये कोळी खेकडा म्हटलं जातं. यातील काही जमिनीवर राहतात तर काही पाण्यात १५० फूट खोलात राहतात. ही आहे गॉबलिन शार्क. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात राहणारी हा शार्क मासा जगातला सर्वात जुन्या जिवंत प्रजातीपैकी एक आहे. या शार्कचा मनुष्यांना धोका नसतो. कारण हा शार्क केवळ छोटे मासे खातो. या जनावराचं नाव आहे आए-आए. ही माकडांची एक प्रजाती आहे. यांची बोटे लांब असतात. हे जीव नेहमी झाडांवरच राहतात आणि फार कमी वेळ खाली उतरतात. तसेच हे केवळ रात्रीच बाहेर पडतात. आए-आए हे आफ्रिकी देश मेडागास्करमध्ये आढळतात. या जीवाचं नाव आहे गेको. हा जीव पालीची एक प्रजाती आहे. यांची लांब शेपटी असते आणि ते सरड्यासारखा रंग बदलू शकतात. हेच कारण आहे की, हे सहजपणे शिकारीपासून बचाव करू शकतात. कुठे कुठे लोक हे जीव पाळतात सुद्धा. याला म्हणतात जाएंट आयसोपॉड. हे समुद्राच्या खोल पाण्यात राहतात. यांची उंची सामान्यपणे एक फूट असते. हे केवळ मांस खातात. यांचे डोळे मांजरींसारखे असतात. याला म्हणतात धब्बा मासा. हा दिसायला जगातला सर्वात खराब आणि भीतीदायक जीव मानला जातो. हा जीव ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात बघायला मिळतो. हा जीव दिसायला भीतीदायक असला तरी यापासून कुणाला काही धोका नसतो.टॅग्स :जरा हटकेसोशल व्हायरलJara hatkeSocial Viral