My favourite girls! सारा तेंडुलकरची मैत्रिणींसोबत भटकंती; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:49 PM 2024-10-02T16:49:14+5:30 2024-10-02T17:07:40+5:30
सारा तेंडुलकरची भटकंती. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
भारतीय क्रिकेटचा चेहरा अर्थात सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.
साराने आता तिच्या मैत्रिणींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
खरे तर टीम इंडियाचा खेळाडू शुबमन गिल आणि सारा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. याचाच दाखला देत चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या.
सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची अँबेसिडरही आहे.
तसेच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते.
केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.