पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 03:47 PM2019-11-05T15:47:04+5:302019-11-05T15:55:05+5:30

नासाकडून इंटरनॅशनल स्पेस सेंटरवरून काढलेले फोटो जारी केले आहेत. या फोटोंमध्ये पृथ्वीची जादुई सुंदरता बघायला मिळते आहे. हा फोटो कॅनडातील मॅरडॉनल्ड लेकचा आहे. (ALL Image Credit : NASA)

ही कोण्या कलाकाराने काढलेली पेंटींग नाहीये. हे अंतराळातून टिपलेलं पृथ्वीचं वास्तविक रूप आहे. हा फोटो आफ्रिकेतील मॉरिसेनिया क्षेत्रातील आहे. याला आय ऑफ सहारा म्हटलं जातं.

मिशिगन लेकची सुंदरता जगभरात चर्चेचा विषय असते. पण अंतराळातून या लेकचा मंत्रमुग्ध करणारा हा फोटो आहे.

नासाच्या कॅमेरातून घेण्यात आलेल्या या फोटोचा नजारा जणू परीलोकासारखाच आहे. हा फोटो पाहून कल्पनेतील परीलोकाची नक्कीच आठवण होते.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून घेण्यात आलेले हे फोटो नासाने त्यांच्या ट्विटर हॅंडलसोबतच वेबसाइटवर शेअर केले आहेत.

इंटरनॅशनल स्पेस सेंटर नासाने पृथ्वीची काही विहंगम फोटो जारी केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की, आपली पृथ्वी स्वर्गासारखीच आहे. हा फोटो आफ्रिके जवळच्या अटलांटिक सागराचा आहे.