त्रिवार सलाम! महामारीमुळे कोरोना योद्धांची होतेय दयनीय अवस्था; ८ महिन्यांनी बदलला नर्सचा चेहरा By manali.bagul | Published: November 25, 2020 07:37 PM 2020-11-25T19:37:10+5:30 2020-11-25T19:47:47+5:30
कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार केला आहे. कोरोना व्हायरसमुळे कोरोना योद्ध्यांच्या आयुष्यावर प्रतिकुल परिणाम घडून आला आहे. रात्रंदिवस कर्तव्य करत असलेल्या कोरोना योद्ध्यांची अवस्था या कालवधीत खूपच बिकट झाली आहे. घरदार सांभाळून पोलीस, डॉक्टरर्स, नर्स १२ ते १४ तासांपर्यंत आपली ड्यूटी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक नर्सचा फोटो व्हायरल होत आहे. या नर्सचे शरीर आणि चेहऱ्यात बदल दिसून येत आहे.
गेल्या ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसशी लढा देता देता या नर्सच्या चेहऱ्यावर परिणाम झाला आहे. तुम्ही या दोन्ही फोटोमध्ये पाहू शकता.
गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून संपूर्ण जगभरातील खासगी सरकारी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग न थकता नेटाने आपलं काम करत आहे.
या दरम्यान अनेक कोरोना योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटूंबातील लोकांना जीव गमवावा लागला . अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. या नर्सने @kathryniveyy या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो पोस्ट केले आहेत.
आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला तासनतास पीपीई किटमध्ये राहावं लागतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का दर दिवशी १० ते १२ तास मास्क आणि पीपीई कीट घालून कोरोना योद्ध्यांना किती त्रास होत असेल. ही नर्स टेनेसीमधील आहे. टेनेसीमध्ये ४, २०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ३, ३०,००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. या नर्सचा फोटो पाहून सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं जात आहे.