पाकिस्तानातील लोकांमुळे हैराण झाली 'ही' टिकटॉक स्टार, थेट दुसऱ्या देशात झाली शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 01:59 PM2020-10-19T13:59:21+5:302020-10-19T14:09:55+5:30

जन्नतने नुकतेच शेअर केले होते की, जेव्हा पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर बंदी आली तेव्हा ती जपानमध्ये होती. जन्नतने आता स्पष्ट केलं आहे की, तिने निर्णय घेतला की, ती आता जपानमध्येच राहणार आहे.

पाकिस्तानची टिकटॉक स्टार जन्नत मिर्झा पाकिस्तानातून आता जपानमध्ये शिफ्ट झाली आहे. २२ वर्षीय जन्नत पाकिस्तानातील पहिली अशी यूजर आहे जिचे टिकटॉकवर १० मिलियनपेक्षा फॉलोअर्स आहे. अशात तिचे फॅन्स तिच्या निर्णयाने चिंतेत आहेत. जन्नतला इन्स्टाग्रामवर १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे फोटोही नेहमीच व्हायरल होत असतात.

जन्नतने नुकतेच शेअर केले होते की, जेव्हा पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर बंदी आली तेव्हा ती जपानमध्ये होती. जन्नतने आता स्पष्ट केलं आहे की, तिने निर्णय घेतला की, ती आता जपानमध्येच राहणार आहे.

जन्नतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होत. त्यावर कमेंट करत तिच्या फॅन्सने विचारले होते की, तू परत पाकिस्तानात कधी येणार आहे. जन्नतने यावर उत्तर देत लिहिले होते की, ती आता जपानमध्ये शिफ्ट झाली आहे.

जन्नतने या तिच्या या निर्णयाचं कारणही सांगितलं. ती म्हणाली की पाकिस्तानातील लोकांच्या खराब मानसिकतेमुळे तिने हा निर्णय घेतलाय.

जन्नतला एका फॅनने विचारले होते की, तू पाकिस्तान का सोडत आहे? यावर जन्नतने उत्तर दिलं होतं की, पाकिस्तान खूप प्रेमळ आणि चांगला आहे. पण पाकिस्तानाील लोकांची मानसिकता चांगली नाही.

याआधी जन्नत मिर्झाने पाकिस्तानातील टिकटॉक बॅनला सपोर्ट केला होता. ती म्हणाली होती की, माझी स्वत:ची अशी इच्छा होती की, पाकिस्तानात टिकटॉक बॅन व्हावं. पण ते नेहमीसाठी बंद व्हायला नको होतं. मला पाकिस्तानात टिकटॉक बॅनची माहिती मिळाली. सध्या मी जपानमध्ये आहे.

जन्नत असंही म्हणाली होती की, अनेक लोक या अॅपच्या माध्यमातून आपलं पोट भरतात आणि तसेच अनेक चांगल्या टॅलेंटच्या लोकांची माहितीही यावरून मिळते. पण या अॅपवर काही व्हिडीओ फारच वाईट असतात.

मिर्झा म्हणाली होती की, सध्या टिकटॉकवर बंदी आवश्यक आहे. पण टिकटॉकवरील कंटेंटबाबत काही नियम असले पाहिजे. यावरील व्हिडीओंवर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे.