Viral: 'मेरे अब्बू है डोनाल्ड ट्रम्प'; पाकिस्तानी तरूणीच्या दाव्यानं सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:13 PM2020-09-07T12:13:43+5:302020-09-07T12:26:22+5:30

सोशल मीडियावर सध्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीत एका पाकिस्तानी तरूणीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिचे वडिल असल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानी तरूणीनं माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडिल असून मला माझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा आहे.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये या तरूणीनं म्हटलं आहे की, ''मला सगळ्यांना सांगायचं आहे. मीच डोनाल्ड ट्रंप यांची खरी मुलगी आहे.''

''मी मुसलमान असून इंग्रज आल्यानंतर तू इथं काय करत आहेस असं मला विचारायचे. मला इस्लाम प्रिय आहे.'' या मुलीच्या अशा बोलण्यानं सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू आहे. अनेकांना या दाव्यानंतर खूप हसायला आलं आहे.

इतकंच नाही तर या मुलीनं तिच्या आईचा उल्लेखही केला आहे. ती म्हणाली, ''डोनाल्ड ट्रम्प नेहमी माझ्या आईला म्हणायचे, तू निष्काळजी आहेस. माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घेत नाहिस.'' या कारणावरून माझी आई आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाद होत असे.

आई-बाबांचे भांडण झाल्यानंतर मला खुप दुःख व्हायचं. मला आता माझ्या वडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या येत्या निवडणूकांच्या कामात व्यस्त आहेत.

आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन लग्न केली असून दोनवेळा त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

Read in English