'गोल्ड मॅन'च्या रूपात ही व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 20:40 IST2019-07-01T20:37:27+5:302019-07-01T20:40:49+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी हा भरपूर सोनं परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

त्याच्या नंतर आता महाराष्ट्रातल्या पुण्यातील प्रशांत लक्ष्मण सपकाळ हे गोल्ड मॅनच्या रूपात इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

ही व्यक्ती शरीरावर एक दोन किलो नव्हे, तर 5 किलो सोनं परिधान करते.

प्रशांत यांचा जन्म पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यानंतर प्रशांत यांनी व्यवसाय सुरू केला आहे.

ते सामाजिक कार्यातून गरिबांना मदतही करतात. प्रशांत दररोज सोन्याची चैन, लॉकेट, ब्रेसलेटच्या स्वरूपात 5 किलो सोनं अंगावर घालतात.

सोन्यावर प्रशांतचं विशेष प्रेम आहे. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशांत यांनी भरपूर कष्ट घेतले.