सोशल मीडियात फेमस व्हायचंय तर वापरा फोटोग्राफीच्या 'या' १२ ट्रिक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:01 PM2019-07-01T16:01:23+5:302019-07-01T16:07:23+5:30

भलेही स्मार्टफोनमुळे सर्वांना वाटत असेल की, ते चांगले फोटोग्राफर झालेत. पण एक चांगला फोटो काढणं इतकही सोपं नसतं. १०० क्लिक्स करून त्यातील एक सिलेक्ट करून अनेक फिल्टर लावा तेव्हा कुठे एक चांगला डीपी तयार होतो. एक चांगला क्लीक मिळवण्यासाठी फोटोग्राफर्स काय काय करतात हे तुम्हाला या फोटोंमध्ये बघायला मिळेल. Barcelona चा फोटोग्राफर Jordi Puig सोप्या ट्रिक्स वापरून एक सुंदर फोटो काढतात. तुम्हालाही या ट्रिक्सची मदत नक्कीच होईल.