प्रजासत्ताक दिन २०२०: विठ्ठलाच्या गाभाऱ्याचे सौंदर्य फुलले तिरंग्याच्या रंगांनी By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:15 AM 2020-01-26T11:15:42+5:30 2020-01-26T11:29:07+5:30
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपुरमधील श्री विठ्ठल मंदिरातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. श्री विठ्ठल मंदिरात देवाचा गाभारा ,चौखांबी, सोळखंभी मंडप,तीन रंगाच्या फुलांनी न्हाऊन निघाला आहे.
झेंडू,पांढरी चमेली तर हिरवी तुळशी अश्या तीन रंगाच्या छटांनी मंदिर फुलून गेलं आहे.
नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून विठ्ठलाचा गाभारा सजवला जातो. पण नेहमीपेक्षा आज विठ्ठलाच्या गाभारा आणि सजावट यांचे सौदर्य पाहण्यासारखे आहे.
विठुराया आणि रुक्मिणी आईला शॉल, उपरणे अशी उबदार वस्त्रे परिधान करण्यात आली आहेत.
यावेळी विशेष म्हणजे तिरंगी उपरण्यामुळे देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
आजचा देवाचा साज आणि सौंदर्य पाहून मन शांत होते. अत्यंत प्रभावीपणे प्रजासत्ताक दिनाच्या थीमचा वापर करून गाभारा सजवला आहे.