Saudi Arabia's Ghost Restaurant: मुडदा बशिवला तो....! सौदीचे अजब, भयानक रेस्टॉरंट! खायचे सोडून बोंबलत पळतच सुटाल... एक झलक पहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:32 PM2022-02-03T14:32:12+5:302022-02-03T14:46:54+5:30

Saudi Arabia's Ghost Restaurant shadows: जगभरात एकसोएक फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार रेस्टॉरंट, हॉटेल्स आहेत. त्यांचे डिझाईन, आर्किटेक्चर, थिम आदी वेगवेगळ्या आहेत. परंतू सौदीमध्ये असे एक रेस्टॉरंट झालेय जे पाहताच तुम्ही किंचाळत, ओरडत बाहेर पळत सुटल्याशिवाय राहणार नाही.

जगभरात एकसोएक फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार रेस्टॉरंट, हॉटेल्स आहेत. त्यांचे डिझाईन, आर्किटेक्चर, थिम आदी वेगवेगळ्या आहेत. परंतू सौदीमध्ये असे एक रेस्टॉरंट झालेय जे पाहताच तुम्ही किंचाळत, ओरडत बाहेर पळत सुटल्याशिवाय राहणार नाही.

भूत-प्रेत आणि हॉरर सिनेमे पाहुनच आपण घाबरतो. अनेकदा पहायलाही जात नाही. परंतू जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या टेबलवरच असे काहीतरी भयानक आले तर...कसे जेवण जाईल? खायचे सोडा, एवढे घाबरून जाल की पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये जायची हिंमत करणार नाही.

सौदी अरेबियातील हे रेस्टॉरंट वेगवेगळे घाबरवणारे आवाज काढून, भूताचे, खून झालेल्याचे देखावे ठेवून लोकांना जेवण वाढले जाते. यामध्ये मानवी हाडे देखील आहेत. (Photo- AFP)

रेस्टॉरंटमध्ये लोकांसोबत खुर्च्यांवर मानवी सांगाडेही बसलेले दिसतात. भितीदायक कपडे घातलेले लोक, झोम्बी बनलेले कलाकार जेवणाच्या दरम्यान त्यांना घाबरवत असल्याचा व्हिडीओ एएफपीने पोस्ट केला आहे. भूत-प्रेतांचे म्युझिक तर वातावरण अधिकच भयावह बनवत आहे.

हे रेस्टॉरंट सौदी अरेबियाची राजधानी रियाधच्या बुलेव्हार्ड शहरात आहे. सौदी अरेबियाने आपली परंपरावादी प्रतिमा उदारमतवादी बनवण्यासाठी हे रेस्टॉरंट उघडले आहे.

रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या नोरा अल-असादने एएफपीला सांगितले: 'मी इथे मजा करायला आणि हसायला आली होती... पण इथले वातावरण आणि शो खरोखरच भीतीदायक आहे.'

२६ वर्षीय नोरा एचआर आहे. रेस्टॉरंटमधील वेटरने काळ्या कवटीतून हसत जेव्हा तिला जेवण दिले तेव्हा ती घाबरली. ती म्हणाली, 'माझी भूकच मेली.'

नोराचा मित्र जवाहर अब्दुल्ला, जो डॉक्टर आहे, त्याला हे रेस्टॉरंट आवडले. तो म्हणाला, 'मला भीतीदायक गोष्टी आवडतात... मला वाटतं वातावरण छान आहे आणि मला खूप मजा येत आहे.' आता प्रत्येकाची आवडीवर हे सारे अवलंबून आहे. अनेकांना हॉरर सिनेमे आवडतात. त्या लोकांना इथे जाणे आवडणार आहे.