DYSP मुलाला ASI आईचा कडक सॅल्यूट! ‘जागतिक छायाचित्रकार दिनी’ आई-लेकाचा फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:15 PM 2021-08-19T20:15:11+5:30 2021-08-19T20:22:37+5:30
गुजरात पोलीस विभागातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कुठल्याही आई-बापासाठी हे भाग्य असतं की ज्या विभागात ते काम करतात त्याचठिकाणी त्यांचा मुलगा अधिकारी बनून येतो. गुजरात पोलीस विभागात एएसआय पदावर तैनात असलेल्या आईच्या आनंद गगनात मावेनासा झाला जेव्हा तिच्यासमोर डीसीपी म्हणून तिचा मुलगा उभा राहिला.
एएसआय आईनं डीएसपी मुलाला पाहून लगेच सॅल्यूट केला ते पाहून मुलानेही त्याच्या आईला सॅल्यूट केला. ज्या आईच्या कष्टामुळे अधिकारी बनलो ते पाहून मुलाला अभिमान वाटला.
आई-मुलाचा हा अविस्मरणीय फोटो गुजरात पोलीस सर्व्हिस कमिशनचे चेअरमन दिनेशा डोसा यांनी शेअर केला त्यांनी म्हटलं की, एका एएसआय आईला यापेक्षा जास्त काय सुख असेल जेव्हा तिचा मुलगा डीएसपी बनून तिच्यासमोर उभा राहिला.
त्यापुढे त्यांनी म्हटलंय की, अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर आणि आईच्या कष्टानं या शिखरावर पोहचलेल्या मुलानं भावूक होत समोर उभ्या असलेल्या आईला सॅल्यूट दिला. गुजरात पोलीस सर्व्हिस कमिशनसाठी हा एक परफेक्ट फोटो आहे.
गुजरात पोलीस सर्व्हिस कमीशनच्या या कौतुकावर विशाल पाबरी नावाच्या या अधिकाऱ्याने आभार व्यक्त केले आहेत. या प्रेमळ कौतुकासाठी मी तुमचा आभारी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
गुजरात पोलिसमध्ये अधिकारी बनलेल्या विशाल राबरी यांच्या शाळेतील एकाने जुनी आठवणी शेअर केली आहे. ज्यात २००९ मध्ये जेव्हा तो ६ वी होता तेव्हा विशाल राबरी आमच्या शाळेत आले होते. तेव्हा एथलेटिक्स ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत ते जिंकले होते. आता १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. ते पोलीस विभागात उच्च पदावर आहे हे पाहून आनंद वाटतो.
गुजरात पोलीस सर्व्हिस कमीशनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई-मुलाच्या या जोडीची अनेकजण कौतुक करत आहेत. मुलगा अधिकारी बनून होत असलेला सन्मान आईसाठी खूप महत्त्वाचा आहे.