Unstoppable Force! चहल की परी; धनश्री वर्माचा बोल्ड अंदाज, चाहते क्लिन बोल्ड, PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:54 PM2024-09-21T13:54:03+5:302024-09-21T14:09:21+5:30

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे.

धनश्री वर्मा नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता धनश्रीने काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.

क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टेप आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री वर्माचे देखील सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.

धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.

आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

नृत्यकला शिकताना युझी आणि धनश्री या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.

भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो.

चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात असते.

धनश्रीने आता लेटेस्ट फोटो शेअर करत 'न थांबवता येणारी शक्ती' असे लक्ष वेधणारे कॅप्शन दिले आहे. यावर चाहत्यांनी 'चहल की परी' अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.