Trending Viral News in Marathi : Pre wedding shoot fule couple jalgaon goes Viral
लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर By manali.bagul | Published: December 20, 2020 12:37 PM2020-12-20T12:37:06+5:302020-12-20T13:20:16+5:30Join usJoin usNext सध्या लग्नाआधी साखरपुड्यासारख्या कार्यक्रमाप्रमाणेच आता प्री-वेडिंग फोटोशुट आता सगळेच कपल्स करतात. सोशल मीडियावर प्री वेडिंग फोटोशूटचा मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. फक्त अभिनेत्री किंवा अभिनेते नाही तर सर्वसामान्य कपल्ससुद्धा आकर्षक प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसून येतात. खासकरून रोमँन्टीक फोटोज काढाण्याला सगळेच मुलं मुली प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला अनोख्या प्री वेडिंग शुटबद्दल सांगणार आहोत. असं प्री वेडिंग फोटोशुट आधी कधीही पाहिलं नसेल. जळगावच्या एका जोडप्यानं सध्याच्या रोमँन्टिक फोटोशूटला महत्व न देता एक आगळं वेगळे फोटोशुट केलं आहे. या जोडप्यानं स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाचा पाया उभारणाऱ्या फुले दांपत्यांच्या वेशात 'प्री-वेडिंग' शूट केलं आहे. जळगावमधील पिंपळगाव हरेश्र्वर (ता. पाचोरा) येथील या जोडप्याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या वेशभूषेतील प्री- वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. अत्यंत साधा, पारंपारिक, साजेसा लूक या जोडप्याचा तुम्हाला पाहायला मिळेल. श्वेता विनोद पाटील आणि मंगेश लोहार यांनी असं या जोडप्यानं नाव आहे. लग्न म्हणजे रोमँटिझम या प्रचलित संकल्पनेपेक्षा आम्ही मा.फुले व सावित्रीमाई यांच्या विचारांनी प्रभावित होऊन हे फोटोशूट केल्याचं श्वेता विनोद पाटील यांनी सांगितलं. एक सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशनाने या दोघांनीही हे प्री वेडिंग फोटो शूट केलं आहे. हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जळगावच्या या जोडप्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Image Credit- Social Media)टॅग्स :सोशल व्हायरललग्नजळगावSocial ViralmarriageJalgaon