क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 12:23 IST2019-02-26T11:57:55+5:302019-02-26T12:23:29+5:30

भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यात अनेक दहशवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन भारतीय सैन्याचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच #josh, #Air strike, #indianairforce #balakot #surgicalstrike2 हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. तसेच काही मजेदार मिम्सही व्हायरल झाले आहेत.