Girl miss behave : 'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:29 PM 2021-04-21T12:29:54+5:30 2021-04-21T12:54:59+5:30
Girl miss behave to avoid covid rtpcr test : यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी प्रवासी महिलेला कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगत असताना या महिलेनं या पोलिसांनाच उलट उत्तरं द्यायला सुरूवात केली. कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात पोलिसांसह गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका जोडप्यानं पोलिसांचा अपमान करत नियमांचे उल्लंघन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आता पुन्हा असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ठिकाणी रेल्वे स्थानकावर एक पोलिस कर्मचारी महिलेला प्रवासी महिला शिवीगाळ करताना दिसून येत आहे.
यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी प्रवासी महिलेला कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगत असताना या महिलेनं या पोलिसांना उलट उत्तरं द्यायला सुरूवात केली. सुरूवातीला ती फोनवरून या पोलिसाची तक्रार करण्याचा प्रयत्न करत म्हणते मला चाचणी करायची नाही.
तरीही नियमांप्रमाणे जबरदस्ती या महिलेची चाचणी करण्यात येते. त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि प्रवासी महिला यांची चांगलीच भांडणं होतात.
जवळपास १ तास पोलिस या महिलेला समजावतात पण ती कोणाचचं ऐकायला तयार नसते. भोपाळ एक्सप्रेसनं ही तरूणी एका लग्नासाठी जोधपूरला आली होती.
दरम्यान राज्य सरकारनं इतर राज्यातून येत असलेल्या प्रवाश्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे तिला स्थानकावर कोरोनाच्या रिपोर्टबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी माझ्याकडे कोणताही रिपोर्ट नसल्याच ती म्हणाली.
त्यानंतर रेल्वे स्थाकातील अधिकाऱ्यांनी तिला सॅम्पल देण्याची मागणी केल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी नीट समजावून सांगितल्यानंतरही या महिलेनं ऐकले नाही . त्यामुळे या महिलेवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशनवर उपस्थित लोकांपैकी एकानं या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.