World's 10 mysterious trees and their interesting facts
काही सुंदर आणि काही विचित्र दिसणारी 'ही' १० झाडे आजही लोकांसाठी बनून आहेत रहस्य! By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:26 PM2020-01-22T15:26:56+5:302020-01-22T15:34:16+5:30Join usJoin usNext जगभरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. काही फारच सुंदर आहेत तर काही रहस्यमय आहेत. काही झाडे अशी आहेत जी आजही लोकांसाठी रहस्य बनून कित्येक वर्षांपासून उभी आहेत. काही अशी रहस्यमय झाडे आहेत ज्यांबाबत तुम्हाला क्वचितच माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच काही रहस्यमय झाडांबाबत आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत. ही झाडे आजही लोकांसाठी उत्सुकतेचा विषय असतात. १) रेन्बो ट्री, हवाई - नावाप्रमाणे हे झाड इंद्रधनुष्यासारख दिसतं. सात रंगानी रंगलेल्या या झाडाचं नाव रेन्हो यूकेलिप्टस असं आहे. या झाडाचं हे अनोखं रूप लोकांसाठी आजही रहस्य बनून आहे. ही झाडे बघण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. २) बाओबाब ट्री, मॅडागास्कर - बाओबाब ट्री मॅडागास्कर आफ्रिकेत आढळून येतात. या झाडाची खासियत म्हणजे तुम्हाला या झाडाला केवळ सहा महिनेच पाने दिसतील. इतर सहा महिने या झाडा पानेच नसतात. या झाडाची उंची २६२ फूटापर्यंत असते. ३) ग्रेट सिकुआ ट्री, अमेरिका - अमेरिकेत आढळून येणारं हे झाड आपल्या लांबी आणि रुंदीसाठी चर्चेत असतं. या विचित्र झाडाचं खोड हे ४ मीटर जाड असतं. ४) ड्रॅगन ट्री, यमन - यमनमध्ये आढळून येणारे हे झाड आपल्या बनावटीसाठी चर्चेत असतं. असे सांगितले जाते की, या झाडातून रक्ताप्रमाणे लाल रंगाचा रस निघतो. ५) बॉटल ट्री, ऑस्ट्रेलिया - या झाडाची बनावट एकदम एखाद्या बॉटलसारखी असते. हे झाड फार विषारी असल्याचंही सांगितलं जातं. पूर्वी शिकारी लोक या झाडातून निघणारा रस बाणावर लावून शिकार करत होते. (Image Credit : Social Media) ६) चॅपल ट्री, फ्रान्स - असे म्हटले जाते की, हे झाड जवळपास एक हजार वर्ष जुनं आहे. याची खासियत म्हणजे या झाडावर विज पडल्यावरही हे झाड सुरक्षित राहतं. (Image Credit : Social Media) ७) एंजेल ओक ट्री, दक्षिण कॅरोलिना- हे झाड जगातल्या अद्भूत गोष्टींपैकी एक आहे. जवळपास ४०० वर्ष जुनं हे झाड एंजेल ओक ट्री चार्ल्सटनजवळील जॉन्स बेटावरील एंजेल ओक पार्कच्या लाईव्ह ओकमध्ये आहे. ८) जबूटीकाबा, दक्षिण अमेरिका - हे झाड रहस्य बनून असण्याचं कारण म्हणजे या झाडाच्या फांद्यांवर नाही तर खोडावर फळं लागतात. ९) अंटार्टिका बीच ट्री, दक्षिण पूर्व ऑस्ट्रेलिया १०) विस्टरिया, जपानटॅग्स :जरा हटकेइंटरेस्टींग फॅक्ट्ससोशल व्हायरलJara hatkeInteresting FactsSocial Viral