सोलापुरात श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 15:07 IST2018-01-12T14:15:22+5:302018-01-12T15:07:12+5:30

श्री सिध्दरामेश्वर यात्रेला शुक्रवारपासून (12 जानेवारी ) सुरुवात झाली आहे.
सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाना तौलाभिषेक करण्याची परंपरा आहे.
मल्लिकार्जुन मंदिर येथील हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली.
माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते येथे आरतीदेखील करण्यात आली.
यानंतर हिरेहब्बू यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभानंतर 7 नंदीध्वजासह पालखी 68 लिंगास मार्गस्थ झाले.