warkari in pandharpur with job and took blessing from vithal
पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 05:18 PM2019-07-12T17:18:45+5:302019-07-12T17:44:06+5:30Join usJoin usNext आषाढी एकदशीनिमित्त चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा जमला आहे, हा क्षण पाहून अभंगातील त्या ओवी आठवतात. भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा... विठ्ठलभक्तीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचे पाऊल आज पंढरीत दाखल झाले. त्यानंतर चंद्रभागेत स्नान करुन विठु-माऊलीचे दर्शन या वारकऱ्यांनी घेतले विठ्ठल भक्तीच्या उत्सवात दंग झालेले वारकरी, देहभान विसरून टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले पांडुरंगाच्या अभंगात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठोबा रायाची पूजा केली, यावेळी बोलताना, गतवर्षी येऊ न शकल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करणयाचा बहुमान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या वारकरी दाम्पत्याला मिळाला अहमदपूरचे चव्हाण दाम्पत्य गेली 40 वर्षांपासून अखंडपणे पंढरीची वारी करतात, यंदा हा सन्मान मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना डोक्यावर कळस घेऊन हातांनी टाळ्या वाजवून, मुखाने विठ्ठलाची गाणी गाऊन पंढरीकडे चाललेली माऊली.... ना पावसाची भीती, ना उन्हाचे चटक्याची चिंता, केवळ मनी पांडुरंगाच्या भक्तीचीच ओढ लागलीय. म्हणूनच पाऊले चालती पंढरीची वाट.. आषाढी एकादशीला वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत पाणी सोडले जाते, या पाण्यात स्नान करूनच वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात विठु-माऊलीच्या पूजेवेळी रखुमाईला नैवैद्य दाखवता सौ. मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी सौ. चव्हाणताई पंढरपूरची वारी पूर्ण करत पंढरपुरात दाखल झाल्यानंतर बाजारात गर्दी केलेले वारकरी मुख्यमंत्र्यांसह पुजेचा मान मिळाल्याने चव्हाण दाम्पत्य अतिशय आनंदी होते, तर यंदा वारकरी संप्रदायाकडून आपला होऊन करुन पूजा करण्याचा मान मिळाल्यानेही मुख्यमंत्रीही खुश होते विठु-माऊलीचे दर्शन झाल्यानंतर पंढरीत पोहोचलेल्या पालख्या आज पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.विठ्ठलाची क्षणीक भेटही वारकऱ्यांना वर्षभराची ऊर्जा देतेटॅग्स :आषाढी एकादशीपंढरपूरपंढरपूर पालखी सोहळाAshadhi EkadashiPandharpurPandharpur Palkhi Sohala