देश-विदेशातील अनोळखी लोकांशी व्हिडीओ चॅट करायचंय? ‘या’ 10 वेबसाईट्स करतील मदत By सिद्धेश जाधव | Published: April 8, 2022 07:17 PM 2022-04-08T19:17:51+5:30 2022-04-08T20:01:47+5:30
फेसबुक आणि इंस्टाग्रामला अनेक लोक कंटाळले आहेत. असे लोक नवीन सोशल मीडिया शोधत आहेत. त्यांच्यासाठी अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या देश-विदेशातील अनोळखी लोकांशी व्हिडीओ चॅट करू देतात. इथे तुम्हाला तुमचं नाव किंवा इतर कोणतीही माहिती देण्याची गरज नसते. तुम्ही हव्या त्या लोकांशी चॅट करू शकता आणि नको त्या लोकांना स्किप करू शकता. चला पाहूया यादी. Omegle Omegle एक लोकप्रिय व्हिडीओ चॅट प्लॅटफॉर्म आहे,ज्याचा वापर जगभरातील अनोळखी लोकांशी गप्पा मारण्यासाठी केला जातो. इथे तुम्ही अनोळखी लोकांशी आपलं नाव, देश इत्यादी न सांगता बोलू शकता.
MeetMe जर तुम्हाला ऑनलाईन नवीन मित्र बनवायचे असतील तर MeetMe हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला व्हिडीओ चॅटसाठी मॅच मिळवण्यासाठी जास्त वेळ वाट बघावी लागत नाही.
ChatHub ChatHub या व्हिडीओ चॅट वेबसाईट वर तुम्हाला साइनअप करावं लागत नाही. तुम्ही जगभरातील कोणतीही एक व्यक्ती तुमच्यासमोर येऊ शकते. इथे दोन रूम आहेत, एक जिथे कोणाशीही काहीही बोलता येईल तर दुसऱ्या रूम्समध्ये बोलण्याचे विषय ठरलेले असतात.
YouNow YouNow वरील चॅट्स तुमच्या वेबसाईटवरील फॉलोवर्सना थेट बघता येतात. तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. फक्त वेबसाईट नव्हे तर अँड्रॉइड आणि आयओएस अॅप मधून देखील युनाऊ अॅक्सेस करता येतं.
CamSurf CamSurf वर देखील साइनअप करावं लागत नाही परंतु त्यामुळे या व्हिडीओ चॅट वेबसाईट आणि अॅपवरील काही फीचर्स वापरता येत नाहीत. ज्यात जेंडर फिल्टर फिचरचा देखील समावेश आहे.
Tinychat Tinychat वर व्हॉइस, व्हिडीओ किंवा टेक्स्ट चॅट करता येतं. इथे आधीच विषयानुसार ग्रुप्स बनलेले आहेत जे तुम्ही जॉईन करू शकता. काही फीचर्ससाठी शुल्क देखील आकारण्यात येतं.
Bazoocam Bazoocam वर अनोळखी लोकांना भेटता तर येतं त्याचबरोबर मल्टीप्लेयर गेम देखील खेळता येतात. तुम्ही तुमच्या परिसरात राहणाऱ्या अनोळखी लोकांना देखील या वेबसाईटवर भेटू शकता.
ChatRandom ChatRandom मध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या देशाची आणि जेंडरची निवड आधीच करून ठेऊ शकता. या वेबसाईटचं अॅप देखील उपलब्ध आहे.
Shagle Shagle मध्ये आधुनिक युजर इंटरफेस मिळतो. इथे तुम्ही अनेक व्हर्च्युअल गिफ्ट्स पाठवू शकता. तसेच व्हिडीओ, इमेज आणि ऑडिओ फाईल्स देखील पाठवतात येतात. या वेबसाईटच्या काही फीचर्ससाठी अकॉउंट ओपन करावं लागतं.
EmeraldChat EmaraldChat वर स्ट्रिक्ट मॉडरेशन आहे, तुम्हाला इथल्या गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. काही फीचर्ससाठी साइनअप करावं लागतं. इथे व्हिडीओ कॉल, चॅट्स आणि ग्रुप चॅटचा पर्याय देखील आहे.