3 easy way to check if your phone is an original or a fake
तुमचा स्मार्टफोन खरा आहे की खोटा?, या पद्धतींनी ओळखा By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:23 PM2018-12-26T17:23:57+5:302018-12-26T17:33:51+5:30Join usJoin usNext भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. यातील काही स्मार्टफोन्सचे फीचर्स भारी आहेत तर काही स्मार्टफोन्सच्या किंमतीच वरचढ ठरत आहेत. भारतीय बाजारपेठेत चिनी कंपन्यांचा दबदबा अधिक दिसून येतो. उदाहरणार्थ, Xiaomi, OnePlus, Oppo, Vivo, Huawei या स्मार्टफोन्सना ग्राहक अधिक पसंती दर्शवतात. पण मोबाइलच्या वाढत्या विक्रीदरम्यान काही फसवणुकीची प्रकरणंदेखील समोर येत आहेत. यामध्ये स्मार्टफोन बनावट असल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अशावेळी स्मार्टफोन खरा आहे की खोटा? हे ओळखणे ग्राहकांसाठी मोठं आव्हान ठरते. स्मार्टफोनवर खर्च करुनही जर प्रोडक्ट बनावट निघालं तर मोठी फसवणूक झाल्यासारखे वाटते. तर आपली अशी फसवणूक होऊ नये, यासाठी स्मार्टफोन खोटा आहे की खरा? याची पडताळणी तुम्ही स्वतःदेखील करू शकता. डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनतर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नवीन सेवेच्या माध्यमातून केवळ एका मेसेजद्वारे तुम्हाला स्मार्टफोनची माहिती मिळवणं शक्य होणार आहे. याशिवाय, अॅपद्वारेदेखील मोबाइल फोनबद्दलची सर्व माहिती जाणून घेता येऊ शकते. अॅप डाऊनलोड करुन फोनचे मॉडेल क्रमांक, ब्रँड आणि संबंधित कंपनीची माहिती तुम्हाला मिळेल. स्मार्टफोनबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी युजरला केवळ एक मेसेज करावा लागेल. यासाठी तुम्हाला आपल्या फोनमध्ये KYM टाइप करुन स्पेस देऊन 15 आकड्यांचा IMEI क्रमांक (उदाहरणार्थ - KYM 123456789123456) एन्टर करावा आणि हा मेसेज 14422 क्रमांकावर पाठवावा. यानंतर काही वेळातच तुम्हाला फोनसंदर्भातील माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. मेसेजव्यतिरिक्त अॅप डाउनलोड करुनही तुम्हाला स्मार्टफोनची सर्व माहिती अगदी सहज मिळेल. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन 'Know Your Mobile' नावाचं अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर फोन IMEI क्रमांक तेथे नोंद करावा आणि 'verify' वर पर्यायावर क्लिक करावं. तुम्हाला काही मिनिटांमध्येच फोनबाबतची सर्व माहिती मिळते. या माध्यमातून तुम्हाला ब्लॅक लिस्टेड क्रमाकांची माहितीदेखील उपलब्ध होऊ शकते. आपल्या फोनचा IMEI क्रमांक जाणून घेण्यासाठी *#06# डायल करा. यानंतर काही वेळातच तुमच्या फोन स्क्रीनवर सर्व तपशील मिळेल. याव्यतिरिक्त मोबाइल कव्हर बॉक्सवर दिलेला बारकोड स्कॅन करुनही IMEI क्रमांक जाणून घेऊ शकता. टॅग्स :मोबाइलतंत्रज्ञानMobiletechnology