सावधान! तुमच्या Android Phone च्या सुरक्षेसाठी हे 5 सिक्योरिटी चेक्स आहेत अत्यंत महत्वाचे; त्वरित जाणून घ्या By सिद्धेश जाधव | Published: January 27, 2022 08:03 PM 2022-01-27T20:03:36+5:30 2022-01-27T20:09:51+5:30
अँड्रॉइड फोनवर मालवेयर किंवा व्हायरसच्या हल्ल्यापासून सुरक्षा करण्यासाठी युजर्स गुगल किंवा अँटी व्हायरसवर अवलंबून असतात. परंतु यांच्या नजरेतुन देखील काही मालवेयर सुटू शकतात याची अनेक उदाहरणं आपण पहिली आहेत. म्हणून आपल्या स्मार्टफोनवर आपलं देखील लक्ष हवं. यासाठी काही अॅप्स सांगत आहे जे तुम्हाला यात मदत करतील. तुमची अँटी-मालवेयर सुरक्षा तपासा तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची सुरक्षा मोफत तपासू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून F-Secure AV Test अॅप इन्स्टॉल करावं लागेल. हा एक निरुपद्रवी व्हायरस आहे, जर तुमची सुरक्षा चांगली असेल तर ती लगेच याला डिटेक्ट करेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या अँटी व्हायरसची तसेच गुगल प्ले प्रोटेक्ट सुरक्षा चांगली आहे कि नाही ते समजेल.
तुमच्या फोनची सेटिंग स्कॅन करा SAFE Me अॅप तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग्स चेक करतो आणि त्यातील धोकादायक सेटिंग्स बदलण्यास मदत करतो.
अॅप पारिमिशन्सवर लक्ष ठेवा App Permission Dashboard अॅप तुम्ही इन्स्टॉल केलेल्या अॅप्सनी कोणत्या परवानग्या घेतल्या आहेत. तसेच त्यातील धोकादायक परवानग्या या अॅपमध्ये हायलाईट होतात. इथून तुम्ही त्या रद्द देखील करू शकता किंवा अॅप अनइन्स्टॉल देखील करू शकता.
अँड्रॉइड अॅप्स स्कॅन करा Jumbo अॅपच्या मदतीने तुम्ही गुगल, फेसबुक, अॅमेझॉन, युट्युब आणि ट्विटरवरील देखील सिक्योरिटीतील दोष शोधू शकता. तसेच फक्त ई-मेल अॅड्रेस देऊन तुमचा डेटा कुठे लीक झाला आहे कि नाही ते बघू शकता.
बॅकग्राऊंडमध्ये रॅम, डेटा आणि बॅटरी कोण खातंय तुम्ही तुमच्या अँड्रॉइड सेटिंगमध्ये जाऊनच बॅकग्राऊंडमध्ये सुरु असलेले अॅप्स आणि सर्व्हिसेस बघू शकता. तसेच त्यातील संशयास्पद सर्व्हिसेस किल करू शकता.
साधारणतः डिफॉल्ट अँड्रॉइड सिक्योरिटीवर विश्वास ठेवता येतो. परंतु कधी कधी सुरक्षेची अजून एक लेयर असणं आवश्यक असतं.