5G Data Price: 5G साठी किती पैसे मोजावे लागणार, आताच कसे सांगणार? पण एअरटेलने दिले संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:10 PM 2022-05-28T14:10:27+5:30 2022-05-28T14:17:04+5:30
सुरुवातीला फाईव्ह जीचे फोन महाग असतील, असे बोलले जात होते. परंतू, जगभरात सर्वाधिक वापरलेल्या फ्रिक्वेन्सी बँडचे फोन आता १२-१३ हजारांपासून मिळू लागले आहेत. देशात आता ५जी सेवा सुरु होण्यास काहीच महिने राहिले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आपण ५जी नेटवर्कची वाट पाहत आहोत. मद्रास आयआयटीमध्ये याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. आता स्पेक्ट्रम लिलावांवर साऱ्यांची नजर आहे. लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.
सुरुवातीला फाईव्ह जीचे फोन महाग असतील, असे बोलले जात होते. परंतू, जगभरात सर्वाधिक वापरलेल्या फ्रिक्वेन्सी बँडचे फोन आता १२-१३ हजारांपासून मिळू लागले आहेत. ७ ते १३ अशा जास्त बँडचे फोन सध्या २० हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत.
असे असले तरी फाईव्ह जी नेटवर्क आल्यावर त्याच्या प्लान्सचे दर किती असणार यावरून लोकांमध्ये उत्सुकता आहे. काहींना ते महाग असतील असे वाटत आहेत. फोरजी पेक्षा दुप्पट, तिप्पट दर असतील असे अंदाज लावले जात आहेत. परंतू जेव्हा ४ जी आले तेव्हा ते थ्रीजी पेक्षाही कमी दरांमध्ये होते. त्यांची फिचर्सही भरपूर होती. अनलिमिटेड डेटा, स्पीड आणि कॉलिंगमुळे ४ जी लोकप्रिय झाले.
तसाच काहीसा प्रकार ५जी बाबत झाला तर, किती छान ना. देशात पहिल्यांदा एअरटेलने ५जी नेटवर्कसाठी तयार असल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स, व्होडाफोनही मागे नाहीय. यातच दर किती असतील यावर एअरटेलने तुलनात्मक संकेत दिले आहेत. स्पेक्ट्रम लिलाव जोवर होत नाही, तोवर या दरांबाबत कुणीही काही सांगू शकत नाही.
एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखोन यांनी इंडिया टुडेला माहिती दिली. जगात ५जी जिथे आहे तिथली माहिती घेतली असता तिथे ४ जी सर्व्हिसवर ग्राहकांना कोणताही प्रिमिअम चार्ज आकारला जात नाहीय. म्हणजेच ५ जी सर्व्हिससाठी आपल्याा खूप जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत, परंतू ही सेवा ४जी पेक्षा थोडी महाग जरूर असेल, असे ते म्हणाले.
मार्चमध्ये एका इव्हेंटमध्ये त्यांनी ५ जी रोलआऊटवर माहिती दिली होती. सरकारने स्पेक्ट्रम लिलाव जाहीर केला की आम्ही रोलआऊट सुरु करू असे ते म्हणाले होते. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी १५ महिन्यांची मेहनत घेतली आहे.